माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्यावर भाजपच्या महामंत्रीपदाची जबाबदारी

प्रथमच महिला पदाधिकाऱ्याला मिळाली संधी

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. त्यात माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांची जिल्हा महामंत्री म्हणून वर्णी लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच जिल्हा महामंत्री म्हणून महिला पदाधिकाऱ्याला संधी देण्यात आली हे विशेष.

पिपरे यांनी नगराध्यक्ष म्हणून गडचिरोली शहरात विविध विकासात्मक कामांना चालना दिली. महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. पक्षाने जे काम सोपविले ते काम पूर्ण निष्ठेने केल्यामुळे त्याचे फळ म्हणून पक्षश्रेष्ठींनी जिल्हा महामंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे पिपरे यांनी सांगितले.