३३ टक्के आरक्षण विधेयकातून महिलांवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू

भाजप महिला आघाडीने केले स्वागत

गडचिरोली : नवीन संसद भवनात प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून पारित केलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाचे गडचिरोली भाजपच्या महिला आघाडीने स्वागत केले. हे विधेयक म्हणजे नारीशक्तीवर दाखविलेला विश्वास आहे, तो विश्वास महिला सार्थ ठरवतील, अशी प्रतिक्रिया भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस यांनी व्यक्त केली.

विश्राम भवनात झालेल्या महिला आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गिता हिंगे यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या विधेयकामुळे भविष्यात महिलांना विविध राजकीय पदांवर काम करण्याची संधी वाढेल. खऱ्या अर्थाने हा नारीशक्तीचा सन्मान आहे, असे म्हणत सर्व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत या विधेयकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.