भाजपचे पदाधिकारी गोळा करताहेत अमृत कलशात घरोघरची माती

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने महाजनसंपर्क सुरू

गडचिरोली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा महा जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. यात घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या ९ वर्षातील कार्यकाळाची माहिती देणाऱ्या पत्रकाचे वाटप करण्यासोबत अमृत कलशात घरोघरची माती गोळा केली जात आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

रविवारी (दि.३) भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये गडचिरोली शहरातील सर्व प्रभागांमध्ये मोदी @ 9 व संपर्कातून समर्थन अभियानांतर्गत महाजनसंवाद, महाजनसंपर्क आणि घर घर चलो अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाघरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सर्व प्रभागांमध्ये जाऊन शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचे आणि नऊ वर्षांमध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांचे पत्रक घरोघरी देत नागरिकांसोबत संवाद साधला.

यावेळी प्रदेश संघटन सदस्य तथा जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, प्रदेश संघटन महामंत्री (अ.ज.मोर्चा) प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी जिल्हा प्रभारी व माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा सचिव गीता हिंगे, अल्का पोहनकर, वैशाली नैताम, अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, भाजयुमो जिल्हा महामंत्री अनिल तिडके, श्रीरंग पतरंगे, विलास नैताम, भाजयुमो विद्यार्थी प्रमुख आशिष कोडापे, जिल्हा सचिव मंगेश रणदिवे, शहराध्यक्ष सागर कुंभरे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, शहर महामंत्री हर्षल गेडाम, निखिल चरडे, जनार्धन साखरे, गोवर्धन चव्हाण, आशुतोष गोरले, साई चिलमवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.