अहेरीसह पेरमिली, रेगुंठा येथे वीज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश

अहेरी : राज्याच्या दक्षिण भागाचे मुख्यालय असणाऱ्या अहेरी नगरासह पेरमिली, रेगुंठा येथील वीजेची समस्या दूर होणार आहे. या ठिकाणी वीज उपकेंद्र उभारले जाणार असून त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसून येते.

अहेरी येथे 33 के.व्ही. वीज उपकेंद्र नसल्यामुळे कमी दाब व विद्युत पुरवठा नेहमी खंडीत होत होता. उन्हाळ्यात तर ही समस्या आणखी तीव्र होत होती. त्यासाठी अहेरी येथील 33 के.व्ही. वीज उपकेंद्र उभारण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. धर्मरावबाबा यांनी मागणीची दखल घेऊन शासनाकडे हा विषय लावून धरला. अखेर अहेरी, पेरमिली तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील विजेची समस्या सोडविण्यासाठी आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे वीज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ना.धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर या परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत.