भाजपकडून रविवारी गडचिरोलीत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे संमेलन

ना.सुधीर मुनगंटीवार करणार मार्गदर्शन

गडचिरोली ः भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियानातून केंद्र सरकारच्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे सुरू असताना आता विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचे संमेलन येत्या रविवारी गडचिरोलीत होणार आहे. या संमेलनाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाच्या नियोजनाबाबत गुरूवारी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. रविवारला दुपारी ३ वाजता धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे होणाऱ्या या जाहीर सभेला नागरिकांनी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

पत्रकार परिषदेला जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा सचिव सुधाकर येनगंधलवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, ओबिसी सेलचे आनंदराव पिरूरकर, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर उपाध्यक्ष श्रीकांत पतरंगे, शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते आदी उपस्थित होते.