गडचिरोली : गडचिरोली शहर भाजपची सदस्यता नोंदणी व बुथ रचना आढावा बैठक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॅा.अशोक नेते होते. यावेळी पक्ष बांधणीच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनीही यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना प्रक्रियेला गती देण्यासाठी रणनिती आखण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे व अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला शहराध्यक्ष कविता उरकुडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.