काँग्रेसने आलापल्लीत घेतली अहेरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

संघटनात्मक बाबींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा

गडचिरोली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेल्या अहेरी विधानसभा मतदार संघात आता काँग्रेसने पक्षविस्तारासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी आलापल्ली येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसभा समन्वयक डॅा.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत संघटनात्मक बाबींवर, बुथ सशक्तीकरण, बीएलए आणि ग्राम कमिटीच्या नियुक्त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याशिवाय येत्या 24 डिसेंबर रोजी अहेरी विधानसभेचा कार्यकर्ता मेळावा आणि 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची सूचना करण्यात आली. तसेच या क्षेत्रातील अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी अधिक जोमाने कामाला लागावे, अशी सूचना महेंद्र ब्राह्मणवाडे व पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी बुथ सशक्त करणे अत्यंत महत्वाचे असून मेरा बुथ सबसे मजबूत अभियान राबवून तत्परतेने कामे करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा लोकसभा समन्वयक डॉ.नामदेव किरसान यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, काँग्रेसचे नेते प्रभाकर वासेकर, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.पप्पू हकीम, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, भामरागड तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, रजाक पठाण, नगरसेवक निजान पेंदाम, लोकेश गावडे, सपना नैताम, अज्जू पठाण, नामदेव आत्राम, वंदना सिडाम, सपना नेताम, वैशाली येरावर, मनिषा काटलावार, सतीश मुप्पलवार, संदीप मारगोनवार, विकास राऊत, राहुल गोरडवार, राघोबा गोरकार, विनोद मडावी, संजय वेळदा, बंडू ढोरपटी, सुरेश दुर्गे, गजानन झाडे, श्रीकांत तेलकुंटलवार, भीमराव करतरकर, नामदेव भांडारकर, रुपेश कंदेकर, निलेश पारधी, गणेश तलांडेसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.