मिळालेल्या निधीचा फायदा घेत एटापल्ली तालुक्यात विकास कामांचा धडाका

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

एटापल्ली : तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागात सध्या विकास कामांचा धडाका सुरू आहे. माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

मंत्रिपद मिळाल्यावर अहेरी विधानसभेसह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठी संधी मिळाल्याचे वक्तव्य मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश येत आहे. आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील बऱ्याच गावात विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे. यात मुख्य रस्ते, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, समाज मंदिर, खडीकरणाची कामे इत्यादींचा समावेश आहे. नुकतेच कसनसूर, हालेवारा, हेडरी, परपणगुडा, गट्टेपल्ली, मवेली, पुनूर आदी गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी पं.स. सभापती बेबी नरोटी, माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी काँग्रेस एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, नगरसेवक जितेंद्र टिकले, माजी जि.प. सदस्य संजय चरडुके, संभाजी हिचामी, लक्ष्मण नरोटी, राजू नरोटी, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, अभि नागुलवार, तसेच सरपंच, उपसरपंच आणि विविध गावातील भूमिया, गाव पाटील तथा नागरिक उपस्थित होते.