ना.धर्मरावबाबा आत्राम आजपासून तीन दिवस गडचिरोलीच्या दौऱ्यावर

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम शुक्रवार, दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता गडचिरोलीत येत आहेत. रविवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

ना.आत्राम सायंकाळी 6 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सुमानंद सभागृह येथे “दोन घरांचं गाव” या नाटकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सुयोग निवासस्थान गडचिरोली येथे मुक्काम करतील.

शनिवार, दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता कमलाताई मुनघाटे हायस्कूल, गडचिरोली येथे आगमन व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता चामोर्शी-आष्टी मार्गे अहेरीकडे रवाना होतील.

रविवार, दि.14 जानेवारी रोजी सकाळी राजवाडा निवसस्थान अहेरी येथून निघून 10 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे येतील. तर दुपारी आरमोरी-ब्रम्हपुरी-नागभीड मार्गे नागपूरकडे रवाना होतील.