अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम चार दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध ठिकाणी उद्घाटन, व भूमिपूजन

गडचिरोली :अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत.

शुक्रवार, दि.16 रोजी सकाळी सुयोग निवासस्थान गडचिरोली येथून 9.30 वाजता चामोर्शी तालुक्यातील मुरखळा येथे आगमन होणार असून वारकरी संप्रदाय तथा बहुउद्देशिय संस्था मुरखळा यांच्या वतीने आयोजित श्रीमत भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमास विठ्ठल आश्रम येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता एटापल्ली येथे आरोग्य शिबिरास उपस्थिती, दुपारी 1.30 ते 2 पर्यंत शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे राखीव राहणार असून दुपारी 2.30 वाजता वेलगूर येथे आगमन व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दुपारी 3.30 वाजता वांगेपल्ली येथे मुख्य रस्ता ते वांगेपल्ली या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 4.15 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे मुक्काम करतील.

शनिवार, दि.17 रोजी सकाळी 10 वाजता क्रीडा संकुल, आलापल्ली येथे महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी 11 ते दु. 1 पर्यंत शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे राखीव, तर दुपारी 2 वाजता छद्देवाडा येथे रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.45 वाजता कमलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून अहेरी येथे मुक्काम करतील.

रविवार, दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी अहेरी येथून आष्टी-गडचिरोली-आरमोरी-वैरागड मार्गे सकाळी 10.30 वाजता आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे कुवारदेव यात्रेस उपस्थित राहतील. सायंकाळी 4.30 वाजता आष्टी येथे रांगोळी स्पर्धेस उपस्थित राहतील. रात्री अहेरीत मुक्काम करतील.

सोमवार, दि.19 रोजी सकाळी 6 वाजता गांधी चौक, अहेरी येथे मॅरेथॉन कार्यक्रमास उपस्थिती, तर दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव. दु.४ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे शिवजयंती कार्यक्रमास उपस्थित राहतील. तेथून आलापल्लीला जाऊन सायंकाळी 7.05 वाजता क्रीडा संकुल, आलापल्ली येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित गायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री
8 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.