चिमूरच्या क्रांतीविरांसह भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनी वाहिली श्रद्धांजली

खा.अशोक नेते, आ.भांगडियांची उपस्थिती

गडचिरोली : चिमूर शहरात १६ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यलढ्यात ९ क्रांतीकारी शहिद झाले. त्यांची आठवण म्हणून चिमूर येथे बुधवारी हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्याम हटवादे, वसंत वारजुरकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे‌, तालुका अध्यक्ष राजू झाडे,नागभीड तालुकाध्यक्ष संतोष लडके, भाजपचे युवा नेते समीर राचलवार, चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तडवेकर, प्रदेश सचिव युवा मोर्चा मनिष तुंमपल्लीवार, माजी सभापती सतीश जाधव, रमेश बोरकर, शहर अध्यक्ष बंटी वनकर, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष माया ननावरे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.