राष्ट्रवादी काँग्रेसने चामोर्शीत साजरी केली आर.आर.पाटील यांची जयंती

जिल्ह्यातील योगदानाची काढली आठवण

गडचिरोली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आर.आर. उर्फ आबा पाटील यांची जयंती बुधवारी (दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार आबांनी या जिल्ह्याच्या विकासात दिलेले योगदान मोठे असल्याचे सांगत त्यांना आदरांजली वाहिली.

यावेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मुलीधर बुरे, संचालकगण नामदेव किनेकर, अरुण लाकडे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मोरेश्वर चलकलवार, बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद मलिक, जि.म.सहकारी बँकेचे संचालक बंडूजी ऐलावार, खविसंचे संचालक पुजाराम वासेकर, माजी अध्यक्ष गुरुदास चुधरी, संचालक निलेश चुधरी, मंजुषा चलकलवार, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश नैताम, तसेच गोकुळ वासेकर, सुशील बंडावार, प्रभाकर आभारे, सुरेश परसोडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, पंकज दहेलकर, भरत घेर, मधुकर गव्हारे, सुधाकर धोडरे, मधुकर बोधलकर, बाजार समितीचे संचालक साईंनाथ पेशट्टीवार, गोसाई सातपुते, सुधाकर निखाडे, खविसंचे शामराव पोरटे, भेंडाळाच्या सरपंच कुंदा जुवारे, कौशल्या पोरटे, कांता आभारे, अशोक आभारे, अरुण बंडावार, महादेव पिपरे, वामन गौरकर, मालता गुलाबसिंग धोती, कबिर आभारे, अक्षय कोहपरे, ताराचंद झरकर, भुषण दहेलकर, दीपक डांगे व कार्यकर्ते उपस्थित होते.