भाजपच्या गोंदिया जिल्हा कामगार मोर्चाच्या प्रभारीपदी गोवर्धन चव्हाण

पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

गडचिरोली : भाजपच्या कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. त्यात गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोवर्धन चव्हाण यांच्याकडे गोंदिया जिल्हा कामगार मोर्चाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. रविवारी त्यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मोर्चाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.