अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळाली मायेची ऊब

तनुश्री आत्राम यांच्याकडून ब्लँकेटचे वाटप

अहेरी : सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ, बिस्कीटांसोबत ब्लँकेटचे वाटप करून वाढत्या थंडीत त्यांना मायेची ऊब देण्यात आली.

कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कनिष्ठ कन्या, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी सुद्धा विविध उपक्रम साजरे करताना त्यांनी शुभेच्छा स्वीकारत उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना थंडीपासून बचाव होण्याच्या उदात्त हेतूने ब्लँकेटचे वाटप केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.