खासदार अशोक नेते यांनी दिली मुलचेरा तालुक्यातील भवानीपूरला भेट

करंटने मृत्यू झालेल्या मुजुमदार कुटुंबाची सांत्वना

मुलचेरा : तालुक्यातील भवानीपूर येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अशोक मुजुमदार (५४ वर्ष) यांचा शेतावर काम करताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने करंट लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांनी दिल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी भवानीपूर येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जि.प.अध्यक्ष सोमया पसुला, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजीव सरकार, तालुका महामंत्री विजय बिश्वास, जिल्हा सचिव बादल शहा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष गणपती, भाजपचे जेष्ठ नेते विधान वैद्य, युवा नेते अशोक बढा़ल, गोकुळ सिद्दार, विवेक हलदार, दिनेश बहादूर तसेच कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.