ना.धर्मरावबाबांच्या उपस्थितीत महायुतीचा आरमोरी, पोर्ला, साखऱ्यात कार्यकर्ता मेळावा

विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प

रोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गुढीपाडव्याला (दि.9) आरमोरी येथे प्रकाश सा.पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी, तसेच पोर्ला येथे शिव मंदिर सभागृहात आणि साखरा येथे महायुतीचे कार्यकर्ता मेळावे घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यांना महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जुन उपस्थित राहून विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प केला.

यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी युतीधर्म पाळत विक्रमी मताधिक्याने आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले.

खा.नेते यांनी मार्गदर्शन करताना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प करत महायुतीची एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. देशाला विकासाकडे अग्रेसर करण्यासाठी आणि गडचिरोलीचे मागासलेपण दूर करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला तुमची साथ लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यकर्ता मेळाव्याला प्रामुख्याने प्रकाश सा.पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार हरिराम वरखडे, लोकसभा प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, शिवसेनेचे नेते हेमंत जम्बेवार, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमीन लालानी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, राष्ट्रवादीचे नेते रिंकू पापडकर, शिवसेनेच्या अमिता मडावी, जिल्हा सचिव नंदू पेठ्ठेवार, पं स.सभापती मारोतराव ईचोडकर, माजी पं.स. उपसभापती विलास देशमुखे, भारत बावनथडे, पवन नारनवरे, शहराध्यक्ष विलास पारधी, नंदू काबरा, प्रकाश अर्जूनवार, मधुकर भानारकर, महिला मोर्चाच्या अर्चना बोरकुटे, तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.