ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत रविवारी गडचिरोलीत विविध कार्यक्रम

एफडीए विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम रविवार, दि.10 डिसेंबरला गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाली 10.45 कोटगल एमआयडीसी मध्ये एलटीबी बेवरेजेस उद्योग प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच 11.15 वाजता कॅाप्लेक्स परिसरातील जवाहर भवनासमोर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी 11.40 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात कॅथलॅब सुविधेसाठी नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास, तर दुपारी 12.15 वाजता मुलींचे वसतिगृह, विसापूर रोड गडचिरोली येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता गोंडवाना कलादालन, पोटेगाव रोड गडचिरोली येथे राष्ट्रीय मानवाधिकार संस्था (एसो) दिल्ली यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार दिवस समाज गौरव सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहून नागपूरकडे प्रयाण करतील.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला हक्काची इमारत

अन्न व औषध प्रशासन विभागाला गडचिरोली कार्यालयाकरीता विश्राम भवनाजवळ 33000 स्केअर फुट इतका भूखंड शासनाकडून मिळाला आहे. सदर जागेवर इमारत बांधकाम करण्याकरीता अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने 7 कोटी अनुदान मंजुर झाले आहे. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन धर्मरावबाबा यांच्या हस्ते 10 डिसेंबरला होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, तर विशेष अतिथी म्हणून आ.रामदास आंबटकर, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्ह्याधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी उपस्थित राहतील, असे सहाय्यक आयुक्त अभय देशपांडे यांनी कळविले.