मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते यांनी बजावला मतदानाचा हक्क

डॅा.किरसान यांचे आमगावमध्ये मतदान

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी मतदानाचा हक्क बजावला. धर्मरावबाबा यांनी अहेरी तालुक्यातील वडलापेठजवळच्या दिना चेरपल्ली या गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तर खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली शहरातील शासकीय विज्ञान केंद्रावर सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी आणि त्यांच्या मुलीनेही मतदान केले.

यावेळी आपली प्रतिक्रिया देताना धर्मरावबाबा यांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या गावी मतदानाचा हक्क बजावला.