गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्याचा आनंद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटून आणि फटाके फोडून साजरा केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मान ठेऊन हा निर्णय घेतल्याने पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात फटाके फोडण्यात आले. त्यानंतर पवारांचा जयघोष करत जिलेबीचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, राकाँचे जिल्हा सचिव कपील बागडे, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल गेडाम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष मिनल चिमूरकर, तसेच संजय कोचे, सुनील कत्रोजवार, दादा चुधरी, महेश टिपले, गुलाम शेख, अजहर बुखारी, अमर खंडारे, किशोर बावणे, संजय शिंगाडे, मल्लया कालवा, पराग दांडेकर, सागर दडमल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.