राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सोमवारी ‘युवा संवाद-वेध भविष्याचा’ शिबिर

धर्मरावबाबा आत्राम, पार्थ पवार येणार

गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भविष्यातील युवकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन आणि आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युवकांचे योगदान वाढावे याकरिता ‘युवा संवाद – वेध भविष्याचा’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन सोमवारी गडचिरोलीत करण्यात आले आहे.

४ मार्चला सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत सुमानंद सुभागृह, आरमोरी रोड येथे होणारे हे शिबिर दोन सत्रात चालणार आहे. पहिल्या सत्रात शिबिराचे उद्घाटन तर दुसऱ्या सत्रात शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष निखील ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ऋषिकांत पापळकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक डॉ.अहेफाज देशमुख, ज्येष्ठ नेते युनूस शेख उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या सत्रातील समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती नाना नाकाडे, युवा नेते श्रीनिवास गोडसेलवार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान युवक व राजकारण, राजकारणामध्ये युवकांची भूमिका, व्यक्तिमत्व विकास व राजकारणात युवकांचा सहभाग, देशाच्या प्रगतीसाठी युवकांचा राजकारणामध्ये सहभाग आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी वक्ता, लेखक अमोल पुसदकर यांचे ‘राजकारणामध्ये युवकांची भूमिका व छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यासोबत सिने अभिनेत्री निशिगंधा वाढ यांचेही मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे युवकांनी या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे.