विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा रविवारी गडचिरोलीत नागरी सत्कार

महाविकास आघाडीसह विविध संघटनांचे आयोजन

गडचिरोली : विधानसभेवर विरोधी पक्षनेते म्हणून दुसऱ्यांदा विराजमान झालेले ना.विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोली आगमनानिमित्त येत्या रविवारी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अनेक संघटनाही ना.वडेट्टीवार यांचा सत्कार करतील, अशी माहिती अॅड.राम मेश्राम यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, शिवसेनेचे (उबाठा गट) सहसंपर्क प्रमुख अरविंद्र कात्रटवार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोचे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितले.

दि.१३ ला दुपारी ना.वडेट्टीवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करून श्री मंगल कार्यालयापासून रॅली काढली जाईल. त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून ही रॅली इंदिरा गांधी चौकातल्या राजीव गांधी सभागृहाच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सत्कार होईल. या कार्यक्रमाला आ.अभिजित वंजारी, युवा काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार उपस्थित राहतील. ना.वडेट्टीवार यांच्या रुपाने गडचिरोलीच्या गौरवात भर पडल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पत्रपरिषदेला पंकज गुड्डेवार, अतुल मल्लेलवार, विश्वजित कोवासे, रमेश चौधरी, सुनील डोगरा, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, डी.डी.सोनटक्के, अविनाश गेडाम, राकेश नागरे, विनोद मैद, राकेश रत्नाकर, माजीद सय्यद, चारूदत्त पोहाने, रामचंद्र वाढई, नंदलाल लाडे, योगेंद्र झंझाड, योगेंद्र ब्राह्मणवाडे, सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, राजेंद्र कुकुडकर, रूपेश टिकले, सुभाष धाईत, राजाराम ठाकरे, सुरेश भांडेकर, महादेव भोयर, जावेद शेख, नंदू कायरकर, मनोज देशमुख, मधुकर नैताम, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, कल्पना नंदेश्वर, वसंत राऊत, जितू मुनघाटे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.