शिवसेनेने गांधी चौकात दिली वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी

बीड प्रकरणाचा गडचिरोलीत निषेध

गडचिरोली : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा स्थानिक शिवसेना (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. क्रुरकर्मा आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला इंदिरा गांधी चौकात फासावर लटकवण्यात आले.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ती क्रुरतेचा कळस आहे. त्यामुळे क्रुरकर्मा कराड याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी केले. या आंदोलनात युवासेनेचे जिल्हाप्रमुख दीपक भारसाकडे, गडचिरोली तालुका प्रमुख वसंत गावतुरे, महिला तालुका प्रमुख वैशाली किरमेजवार, शहर प्रमुख शितल बन्सोड, याशिवाय रूपेश देवलकर, राहुल येमुलवार, कपिल पाल, कल्पक मुप्पीडवार, दिलीप गोवर्धन, बाळकृष्ण पाटील बोरकुटे, लोकेश जेंगठे, सत्यपाल कुत्तरमारे, परवेझ शेख, मयुर बंडावार, जितेंद्र संगावार, गोविंदा सुरपाम, नेपाळ मादमवार आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.