मी दिल्लीत अडकलो असलो तरीही मनाने तुमच्यासोबतच- खा.नेते

अधिवेशनातून दिल्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गडचिरोलीत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीच्या व्हिडीओ क्लिप पाहून मला अतिशय आनंद झाला. दिल्लीत महत्वाचे अधिवेशन सुरू असल्याने मला सभागृहातून हलता आले नाही. त्यामुळे आदिवासी समाजाच्या या उत्साहात मी सहभागी होऊ शकलो नाही. मात्र मी दिल्लीत असलो तरीही माझे मन तुमच्यासोबतच होते, अशी भावना खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही व्यक्त केल्या.

यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन गडचिरोली शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पिवळे वस्र परिधान करून विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, युवक-युवतींनी सहभागी होऊन आदिवासी गितांच्या तालावर मिरवणूक काढली. तीव्र ईच्छा असतानाही आपण या दिवशी तुमच्यासोबत आनंद साजरा करू शकलो नाही, अशी खंत खासदार नेते यांनी व्यक्त केली.