रेखाताई पोहोचल्या अतिसंवेदनशिल भागात

महिलांसोबत साजरा केला आदिवासी दिन

अहेरी : भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस यांनी आदिवासी दिनानिमित्त दक्षिण गडचिरोलीतील अतिसंवेदनशिल भागाचा दौरा करून तेथील महिलांसोबत आदिवासी दिन साजरा केला. भामरागड, पेरमिली, आलापल्ली येथे आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात त्यांच्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या विजया विठ्ठलानी, रहिमा सिद्दीकी, छाया गजभिये, माया दुर्गामी, भारती इस्टाम आदी पदाधिकारी होत्या.

भामरागड येथील आदिवासी महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आदिवासी समाजाने जल, जंगल, जमिनीचे पुरातन काळापासून रक्षण केले. वीर बाबुराव शेडमाके हे एक योद्धा होते. त्यांची लढाऊ वृत्ती आणि आदिवासींच्या स्वाभिमानासाठी दिलेले बलिदान कायम लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

भामरागड येथे माडिया समाजाच्या पद्धतीनुसार नृत्य सादर करण्यात आले. यावेळी रेखा डोळस यांनीही त्यात सहभागी होऊन नृत्य केले. पेरमिली येथे सुद्धा भाजपा महिला मोर्चाच्या चमुने महिलांच्या घरांना भेटी दिल्या.