अहेरी एसटी आगारात आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन

अजय कंकडलावार प्रमुख अतिथी

अहेरी : एस टी महामंडळाच्या अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविस नेते अजय कंकडलावार होते.
यावेळी कंकडलावार यांच्या हस्ते बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे यावेळी अजय कंकडलावार म्हणाले. यावेळी त्यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.