आविसंचे नेते अजय कंकडालवार यांनी केला ना.विजय वडेट्टीवार यांचा सत्कार

गडचिरोली : राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचा रविवारी गडचिरोलीत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार आणि आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी ना.वडेट्टीवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमानंतर गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चाही केली. यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्रीनिवास राऊत, शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगडे, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.