तिरंगा यात्रेचा प्रचाररथ हिरवी झेंडी दाखवून गडचिरोलीतून रवाना

खासदार-आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यांमध्ये १५ ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या तिन्ही तालुक्यांमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेचा प्रचार करणाऱ्या प्रचार रथाला खासदार अशोक नेते व आमदार डॉ.देवराव होळी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी लोकसभेचे प्रभारी प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महामंत्री तथा माजी नगरसेवक केशव निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, अल्का पोहनकर, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, पदाधिकारी विवेक बैस, देवाजी लाटकर, राजू शेरकी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.