शहरी प्रकल्पातील अंगणवााडी कर्मचाऱ्यांचे इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन

शासनाविरोधात केली घोषणाबाजी

गडचिरोली : अंगणवाडी शहरी प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमधील सेविका आणि मदतनिसांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली भारती रामटेके व वेणूताई खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनिषा जुमडे, ताई संगेवार, विभा रायपुरे, हेमा खोब्रागडे यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.