अहेरीत ६२ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन

अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

अहेरी : येथील राजे विश्र्वेश्वरराव महाराज चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ६२ लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेतील गॅस कनेक्शनचे वितरण माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेथाकील हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून गजानन राहूलवार मंचावर उपस्थित होते.

दारिद्रय रेषेखालील महिलांना तब्बल ५० दशलक्ष एलपीजी कनेक्शनचे वितरण करण्याची कल्पना या योजनेमार्फत करण्यात आली होती. मार्च २०२० पर्यंत या योजनेमार्फत आठ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट सरकाने ठरवले होते. महिलांचे कष्ट दूर करणे व त्यांना सक्षमीकरणास चालना देणे, आरोग्याच्या समस्या टाळणे असे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि काही अडचण येत असल्यास भाजपा कार्यकर्त्यांची मदत घ्याव, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समितीचे सर्व सदस्य तसेच ग्रामीण महिला उपस्थित होत्या.