देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे यांची बहुमताने निवड

सात विरूद्ध दोन अशी घेतली आघाडी

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी ७ विरुद्ध २ अशी आघाडी घेवून सरपंचपदाची निवडणूक जिंकली.

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या ९ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

कुमरे सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, रोहिदास कुमरे, अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ.गुरुदास सेमस्कर, कृष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड.नर्गिस पठाण, निशा आयतुलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.