‘रन फॉर नेशन, रन फॉर मोदी’, भाजपची नारी शक्ती वंदन मॅराथॅान

खा.नेते यांनी दाखविली हिरवी झेंडी

गडचिरोली : भाजपच्या महिला आघाडीकडून सोमवारी (दि.4) सकाळी 7 वाजता इंदिरा गांधी चौकापासून ते आयटीआय चौकापर्यत नारी शक्ती वंदन मॅराथॉनचे आयोजन केले होते. ‘रन फॉर नेशन, रन फॉर मोदी’ असे घोषवाक्य घेऊन काढलेल्या या मॅराथॅानचे उद्घाटन भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा.अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे यांच्या नेतृत्वात या मॅराथॅानचे आयोजन केले होते. यामध्ये नवमतदार मुली, महिला बचत गटाच्या सदस्य, एनजीओच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. राष्ट्र निर्माणात नारीशक्तीच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून देशासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनात या मॅराथॉनचे आयोजन केले होते.

या मॅराथॅानमध्ये प्रथम क्रमांक- वैशाली वसंत कोवासे, द्वितीय – ज्ञानेश्वरी बंडू गेडाम, तर तृतीय क्रमांक- श्रुती सुनील बावणे यांनी पटकावला. त्यांनाअनुक्रमे प्रथम बक्षीस 7001 रूपये, द्वितीय 5001 रू. आणि तृतीय बक्षीस 3001 रुपये, तसेच प्रोत्साहनपर 1000 रुपयांचे पाच बक्षीस देण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना विशेष गिफ्ट खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, योगिता पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार, कामगार मोर्चाचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, दलित आघाडीचे अरुण उराडे, सुशिल हिंगे, केशव निंबोळ, विनोद देवोजवार, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री त्रिषा डोईजड, कविता उरकुडे, अर्चना निंबोळ, पुष्पा करकाडे, वैष्णवी नैताम, निता उंदिरवाडे, सीमा कन्नमवार, पूनम हेमके, कोमल बारसागडे, स्वाती चंदनखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.