दहावीच्या निकालात राणी दुर्गावती शाळेच्या 24 विद्यार्थिनींचे प्राविण्य श्रेणीत यश

शाळेतील 96.55 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल सोमवारी जाहीर झाला. यात राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचे 96.55 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम येण्याचा मान मानसी रायपूरे हिने पटकाविला. तिला 95.20 टक्के गुण मिळाले आहेत.

याशिवाय द्वितीय समीक्षा पिपरे हिने 92.40 टक्के, तर तृतीय रितू बोटरे हिने 91.60 टक्के गुण घेतले. स्नेहा बोधलकर (87 टक्के), वैष्णवी कमलापूरवार (86.60 टक्के) तथा नम्रता मंडल (86 टक्के) या विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणीत उल्लेखनिय यश मिळविले. यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थिनींपैकी प्रावीण्य श्रेणीत 24, प्रथम श्रेणीत 30, द्वितीय श्रेणीत 24, तर उत्तीर्ण श्रेणीत 6 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

या उल्लेखनिय यशाबद्दल प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाऊसाहेब येरमे, शाळेच्या प्राचार्या वैशाली मडावी, शिक्षकवृंद चुऱ्हे, पिलारे, धोडरे, चुधरी मॅडम, जेल्लेवार, मंडवगडे व सतीश मडावी उपस्थित होते.