प्रांतिक तैलिक महासभेच्या विभागीय महिला आघाडी उपाध्यक्षपदी योगिता पिपरे

समाजासाठी केलेल्या कार्यामुळे दिली जबाबदारी

गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृहात पार पडली. यावेळी गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नागपूर विभागीय महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात समाजासाठी चांगले कार्य केल्याने आणि एक क्रियाशील व्यक्तिमत्व, समाजकार्यातील योगदान पाहून त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ.भूषण कर्डिले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या विदर्भ संघटक माधुरी तलमले यांच्या हस्ते योगिता पिपरे यांना उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.

याप्रसंगी कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव संजीव शेलार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले, गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोद पिपरे, तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी, सभासद व समाजबांधव उपस्थित होते.