अहेरी : कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा असून कार्यकर्त्यांच्या सहाय्याने यशाचे शिखर गाठता येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, माजी आमदार रामकृष्ण मडावी, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, पुष्पा अलोणे, महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, इसाक शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, पक्षाचे व नेतेमंडळीचे भवितव्य हे पक्षातील कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्ते खंबीर होते म्हणून मी सलग दोनदा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी प्रामाणिक साथ व सहकार्य दिल्याने नव्या जोमाने उभारी घेतल्याचे ते म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, रविंद्रबाबा आत्राम, रविंद्र ओल्लालवार, बबलू हकीम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. रियाज शेख यांनी तर कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.अजितदादांना श्रद्धांजली !
28 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने आढावा बैठकीच्या सुरूवातीला दोन मिनिटे मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
































