
चामोर्शी : भारतीय जनता पक्ष, घोट-आष्टी मंडळाच्या वतीने घोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा महोत्सव 2026” अंतर्गत रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या रक्तदान शिबिराचे आणि इतर उपक्रमांचे उद्घाटन आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, भारत स्वाभिमान न्यासचे अशोक पोरेड्डीवार, घोटच्या सरपंच रुपाली दूधबावरे, भाजपचे नेते रमेश भुरसे, अनिल पोहणकर, भारत खटी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, मसाला भात वाटप तसेच विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम साई मंदिर येथे राबविण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भारत स्वाभिमान न्यास व घोटवासियांच्या वतीने आमदार डॅा.नरोटे यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमास रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्र व घोट सुभाष ग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने घोट आष्टी मंडळाचे अध्यक्ष राकेश सरकार, संजय पंदीलवार, माजी सरपंच अनिता रॉय, भाजपचे आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष विलास ऊईके, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, आसिफ शेख, दिनेश मुजुमदार, महेश बिश्वास, विकास मैत्र, महिला महामंत्री विशाखा सिंह, लिना बिस्वास, विलास वडेट्टीवार, महेंद्र मडावी, जितेन शहा, सचिन साखरकर, मेघा कुमरे, प्रवीण गेडाम, महामंत्री पलाश घरामी, मानवाधिकार संघटनेचे सोम वैद्य, महेश विस्वास, मिहीर विस्वास व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































