गडचिरोली : यावर्षी तापमानात कमालीची वाढ झाल्याने मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रचंड वाढलेल्या तापमानात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, आणि ‘जल हेच जीवन’ हे ब्रीद जोपासून या जि.प.क्षेत्राचे लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे समस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाणीटंचाई निवारण्यासाठी हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला. पाण्याची समस्या असलेल्या गावातील वार्डात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबली असून अरविंद कात्रटवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. पाणी पुरवठयाच्या शुभारंभाप्रसंगी गावातील महिला व नागरिक, तसेच अरविंद कात्रटवार मित्रपरिवारातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी कात्रटवार म्हणाले, पाणी ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. जलसंपत्ती सुरक्षित असेल तरच मानवी भविष्य सुरक्षित राहील. भविष्यातील पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून, समाजात जागृती निर्माण करणे आणि पाण्याचा थेंबन् थेंब वाचवणे ही काळाची गरज आहे. ‘जल हेच जीवन आहे’ हे सत्य मानून आपण सर्वांनी पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. आजच्या आधुनिक युगात वाढते औद्योगिकीकरण, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि भूजलाचा अमर्याद उपसा झाल्यामुळे अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उपाययोजना आणि जलसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे रक्षण करणे आपली नैतिक जबाबदारी आहे, असेही अरविंदभाऊ म्हणाले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, राहुल सावरकर, नंदू सडमाके, दिलीप वलादे, मधुकर बावणे, गिरीश टेकाम, साहिल कोहपरे, विकास ठाकुर, कैलास लाडे, पुरुषोत्तम कुमरे, बालाजी चापले, गणेश झंझाळ, विश्वनाथ भनारकर, विलास ढोलणे, दीपक कोसनशिले, महेश खेडेकर, जगण चापले, निकेश लोहंबरे, प्रकाश भजभुजे, महेश भोयर, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, बंटी पेंदाम, अजित समर्थ, प्रकाश ठाकरे, शुभम समर्थ, सुरेश कोलते, विनोद खेवले, प्रज्वल वट्टे, नेत्रेश कोलते, मयुर भोयर, मोहित लाजूरकर, अभिजित खेवले, अरुण पेंदाम, नितेश बुराडे, राजेंद्र मेश्राम उपस्थित होते.
































