Home राजकीय घडामोडी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 5000 युवांना देणार मोफत पुस्तके

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 5000 युवांना देणार मोफत पुस्तके

खा.डॉ.किरसान यांचा उपक्रम

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही 14 जुलै रोजी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 5000 विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण, तसेच विविध सामाजिक, जनहित आणि सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खासदार जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, आदिवासी सेलचे अध्यक्ष माधव गावड, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष कुणाल पेंदोरकर, तालुकाध्यक्ष गडचिरोलीचे वसंत राऊत, चामोर्शीचे प्रमोद भगत, आरमोरीचे मिलिंद खोब्रागडे, धानोराचे प्रशांत कोराम, वडसाचे राजेंद्र बुल्ले, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजवानी, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, दिवाकर निसार, नदीम नाथानी, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, लालाजी सातपुते, विजय लाड, निकेश गद्देवार, जितेंद्र मुपिडवार, गणेश कोवे, रवींद्र पाल, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे, रीता गोवर्धन, कविता उराडे, सोनू आलम, स्वप्नील बेहरे, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, संदीप भैसारे, विजय राऊत, तेजस कोंडेकर, सुशील शहा, परिमल बहादूर, सुधीर बांबोळे, रवी मेश्राम, मारोती कांबळे, दिनेश चापले, निखिल पुण्यप्रेड्डीवार, गजेंद्र नाईक, कुणाल आभारे, गौरव नवघडे, अमर नवघडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.