गडचिरोली : वडसा आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासोबत नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी खा.डॅा.नामदेव किरसान यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. नवी दिल्लीतील संसद भवनातल्या कार्यालयात त्यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र दिले.
यावेळी किरसान यांनी वडसा ते गडचिरोली हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासह गडचिरोली ते छत्तीसगड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबतही चर्चा केली. किरसान यांनी वडसा रेल्वे स्टेशनवर गाडी क्र.22173 व 22174 या जबलपूर ते चांदा फोर्ट आणि चांदा फोर्ट ते जबलपूर या गाड्यांचा थांबा देण्याबाबत, तसेच गाडी क्र. 07051 व 07052 हैद्राबाद ते रकसौल व रकसौल ते हैद्राबाद या रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली. याशिवाय गाडी क्र. 12069 व 12070 रायगड ते गोंदिया व गोंदिया ते रायगड जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबा आमगांव स्टेशनवर देण्याबाबत त्यांचेकडे मागणी करुन तसे पत्र रेल्वेमंत्र्यांना दिले.