सिरोंचा तालुक्यातील नगरमच्या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील संघांचा सहभाग

कोणी केले आयोजन, कोण जिंकले, वाचा

सिरोंचा : क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी तालुक्यातील नगरम येथे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मदतीने राजे फॅन्स क्लबच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्हाभरातील कबड्डी संघांनी सहभागी होऊन क्रीडा कौशल्य दाखविले.

स्पर्धेतील विजेत्या उडान संघाला शिल्ड आणि 21,000 रुपये बक्षिस देण्यात आले. तसेच उपविजेत्या एस.के.नगरम संघाला शिल्ड आणि 11,000 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग होण्याची संधी मिळावी आणि भविष्यात क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी करिअर घडवावे, आपल्या क्षेत्राचा नावलौकिक वाढवावा यासाठी अम्ब्रिशराव आत्राम नेहमीच युवकांना प्रेरीत करत असतात, तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यातल्या गावांत क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.

बक्षिस वितरण कार्यक्रमाला सिरोंच्या तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी शंकर नरहरी, राजेश संतोषवार, सीतापट्टी गट्टू, चंद्रशेखर चेम्मकरी, राम सिरंगी, शाहरुख पठाण, नागराजू गौरारपू, महेश गौरारपू, शुभम येरोला, महाकाली गांगुरी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.