बारावीच्या परीक्षेसाठी उरला आता केवळ एक आठवडा, तयारी झाली का?

कोणती मदत हवी, ‘हेल्पलाईन’ सक्रिय

गडचिरोली : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) या बोर्डाच्या परीक्षा अनुक्रमे येत्या 21 फेब्रुवारी आणि १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल, परीक्षेसंदर्भात टेन्शन आले असेल, काही प्रश्न पडले असतील तर तुमच्या मदतीसाठी शिक्षण मंडळाने नागपूर विभागस्तरावर, तसेच गडचिरोली जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन सुरू केली आहे. 12 वी परीक्षेसंदर्भात समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन 14 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे, तर 10 वी साठी 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

या परीक्षांसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षा व परिक्षेसंबंधी गोपनीय माहिती वगळून अन्य माहिती मिळविण्याकरिता नागपूर विभागीय मंडळाद्वारे या दोन्ही परिक्षांच्या कालावधीदरम्यान विभागीय व जिल्हास्तरावर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ‘समुपदेशन केंद्र’ आणि ‘हेल्पलाईन’ची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी विभागस्तरावर 12 वीच्या परिक्षेसाठी संपर्क अधिकारी म्हणून एस.एस.बुधे (मो.क्र. 9404339992), डी.बी.पाटील (मो.क्र. 7709157172), ए.बी.शेंडे (7020737434) आणि 10 वीच्या परिक्षेकरिता संपर्क अधिकारी व्ही.आर.देशमुख (मो.क्र. 8830458109), पी.ए. कन्नमवार (9673163521) आणि एस.आर.अहीर (8308007613) हे राहतील. तसेच विभागीय मंडळ कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 0712-2553507 आणि 0712-2553503 वरही माहिती प्राप्त करता येणार आहे.

जिल्हास्तरावरील डी.एम.जवंजाळ (रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता.देसाईगंज, जि.गडचिरोली मो.क्र. 9421817089) तसेच ए.एल.नुतिल कंठावार (लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली मो.क्र.9421732956) यांच्याकडून माहिती प्राप्त करता येईल. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवश्यकतेनुसार या समुपदेशन केंद्रांची व हेल्पलाईनची सुविधा घ्यावी, असे शिक्षण मंडळाकडून कळविण्यात आले आहे.