महिलेच्या मृत्यूने खचलेल्या मडे कुटुंबियांचे भाग्यश्री आत्राम यांनी केले सांत्वन

मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिली मदत

सिरोंचा : तालुक्यातील बामणी येथील सुशिला मारा मडे यांचा 6 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी बामणी गाठून मृत महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य समय्या कुळमेथे यांचे नातेवाईक असलेल्या मारा मडे यांची पत्नी सुशिला यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती असल्याची माहिती भाग्यश्रीताईंला मिळाल्यानंतर त्यांनी गावात जाऊन मारा मडे व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच आर्थिक मदतही केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकटलक्ष्मी आरवेली, माजी पंचायत समिती सदस्य समय्या कुळमेथे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.