सिरोंचा तालुक्यातील कबड्डी स्पर्धकांना जोडे खरेदीसाठी मिळाला आर्थिक आधार

अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून मदत

सिरोंचा : गडचिरोली पोलिस दलातर्फे गडचिरोली महोत्सवासह विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्या निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील अनेक मुलांनी कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावी सराव केला. यातील बहुतांश युवकांकडे जोडे (बुट) उपलब्ध नसल्याने ते त्रास सहन करत अनवाणी सराव करत होते.

आर्थिक स्थिती चांगली नसल्याने महागडे जोडे विकत घेणे शक्य होत नव्हते. याबद्दलची माहिती सिरोंचा येथील कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली. त्यामुळे त्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत जोडे खरेदी करून देऊन त्यांचा स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर केला. तसेच स्पर्धेत यशस्वी होऊन आपल्या क्षेत्राचा नावलौकिक वाढवा, असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.