गडचिरोली जिल्हा एनएसयुआयच्या अध्यक्षपदी निशांत वनमाळी यांची नियुक्ती

ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

वनमाळी यांना नियुक्तीपत्र देताना ना.विजय वडेट्टीवार, सोबत डॅा.नामदेव उसेंडी

गडचिरोली : एनएसयुआयच्या जिल्हाध्यक्षपदी निशांत वनमाळी यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी आणि प्रभारी कन्हैया कुमार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी वनमाळी यांची नियुक्ती केली.

नियुक्तीपत्र देताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, उद्योगपती भाऊसाहेब कुर्जेकर, निखील सुरमवार, डॉ. विनय उसेंडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.