वाघिणीसह चार बछड्यांनी केलेली लाईव्ह शिकार कॅमेराबद्ध

गुरवळाच्या जंगलात पर्यटकाने टिपला व्हिडीओ

गडचिरोली : येथून १२ किलोमीटरवर असलेल्या गुरवळा येथील जंगलात एका वाघिणीसह तिच्या चार बछड्यांनी केलेली गायीची शिकार कॅमेराबद्ध करण्यात एका पर्यटकाला यश आले. अवघ्या दोन ते तीन आठवड्यापूर्वी गुरवळाच्या जंगलात दाखल झालेली ही वाघिण आणि तिचे चार बछडे जंगल सफारीवर येणाऱ्या पर्यटकांना नियमित दर्शन देत आहे. आता त्यांनी केलेली एका गायीची शिकार पर्यटकांना लाईव्ह पहायला मिळाली. एकातरी वाघाची झलक पहायला मिळावी, या आशेने जंगल सफारीवर येणाऱ्या पर्यंटकांना या शिकारीच्या निमित्ताने चक्क पाच वाघांची झलक एकाचवेळी पहायला मिळाली. गुरवळा येथील पोषक वातावरणात ही वाघिणी आणि तिचे बछडे चांगलेच रमल्याचे दिसून येत आहे.