अबनपल्लीत मान्सूनपूर्व पावसासह वादळाचे थैमान, अनेक घरांना फटका

नुकसानग्रस्तांना अजय कंकडालवार यांची मदत

अहेरी : अहेरी तालुक्यातील अबनपल्ली येथेल सोमवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे व्यंकटरावपेठा ग्रामपंचायत अतंर्गत येत असलेल्या अबनपल्ली गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी अबनपल्ली येते जावून नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत केली.

अबनपल्ली येथील नुकसानग्रस्त नरेश कुमराम, तुकाराम मडावी, सोमा मडावी, व्यंकटेश आत्राम, विनोद सडमेक, बुधा लालू सडमेक, संन्याशी सडमेक, चपतराव मडावी, भैय्याजी मडावी आदी कुटुंबांना रोख मदत केली. यावेळी अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रा.पं.सदस्य मीना गर्गम, माजी उपसरपंच शामराव राऊत, केशवराव सडमेक, अनमोल सडमेक, सुनीता गर्गम, दिंगाबर गर्गम, नरेंद्र गर्गम, नरेश कुमराम, लक्ष्मण सडमेक, संपत मडावी, पेंटा मडावी, राकेश सडमेक, विनोद सडमेक, राजू सडमेक, पुणेश मडावी, संतोष कुमराम, सुधाकर कुमराम, रवी सडमेक यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उपस्थित होते.