अहेरी : विजयादशमी आणि आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचा योग एकाच दिवशी आल्याने अहेरीत येत्या 20 आॅक्टोबर रोजी रात्री कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे. येथील बाजारवाडीच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या शानदार दुय्यम मुकाबल्यासाठी सुप्रसिद्ध कव्वालांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यातील मुकाबला अहेरीकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. (खाली वाचा)

दरवर्षी विजयादशमीच्या शुभपर्वावर धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने कव्वालीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी धर्मरावबाबांचा वाढदिवस आणि विजयादशमी एकाच दिवशी येण्याचा दुग्धशर्करा योग आल्याने अहेरीवासियांमध्ये उत्साह संचारला आहे.
या कव्वालीच्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान, अजीज नाझा आणि सुप्रसिद्ध कव्वाला गीता सिंग चिस्ती हे येणार आहेत. त्यांच्यात रात्री 8 वाजता कव्वालीचा शानदार दुय्यम मुकाबला रंगणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन फॅन्स क्लबकडून करण्यात आले आहे.
अभिनेता चेतन हंसराजही येणार
‘कुक डू कू’ चित्रपटाचे व महाभारत मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज 20 ऑक्टोबरला आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या भेटीला राजवाड्यात सकाळी 11 वाजता येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात येणार आहे.
































