गडचिरोलीतील ‘आय-फार्म’मध्ये यशस्वी ठरला विविध फळझाडे लागवडीचा प्रयोग

कृषी पर्यटन, मुक्कामाचीही सोय, पहा झलक

गडचिरोली : पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन प्रकारचे पिक घेताना मोठी जोखिम पत्करावी लागते. त्यामुळे शेतकरी वर्ग त्यासाठी सहसा हिंमत करत नाहीत. पण गडचिरोलीत राजेश ईटनकर यांनी हौस म्हणून विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. या झाडांचे संगोपन करणे आणि ही फळं आली की मित्रवर्ग आणि आप्तेष्टांमध्ये वाटणे हा त्यांचा नित्यक्रम गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे ‘आय फार्म’ या नावाने मुख्य मार्गालगत असलेल्या त्यांच्या या शेतात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासोबत मुक्कामी राहण्याचीही सुविधा केली असल्याने कृषी पर्यटकांसाठी हे एक आकर्षण ठरले आहे.