औद्योगिक विकासामुळे नक्षलवादाला आळा बसेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

उपमुख्यमंत्र्यांची धावती भेट, काय म्हणाले?

गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून सुरजागड लोहखाणीसह लॅायड्स मेटल्सच्या स्टिल प्लान्टला भेट दिली. खाणींवर आधारित औद्योगिक विकासामुळे गडचिरोली जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय बेरोजगारीमुळे नक्षलवादाकडे वळलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळून नक्षलवादाची समस्याही दूर होईल, असे अजितदादा म्हणाले. काय काय म्हणाले अजितदादा, पहा सोबतचा व्हिडीओ.