गोकुळनगर, विसापूर मार्गावरील नागरिकांना वाटली ब्लँकेटसह मिठाई

त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा- खा.नेते

गडचिरोली : दिवाळीच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या विविध भागातील गोरगरीब नागरिकांना खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि पदाधिकाऱ्यांनी मिठाई, तसेच थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचे वाटप केले. शुक्रवारी गोकुळनगर आणि विसापूर मार्गावर अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद मानसिक समाधान देणारा आहे, अशी भावना यावेळी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी ‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान मे’ हा नारा प्रत्यक्षात उतरवत हा स्तुत्य उपक्रम राबविला. दिवाळीसारख्या सणाला गडचिरोली शहर परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या गरीब, भटक्या लोकांना हे साहित्य वाटण्यात आले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्नर काटवे, अनिल कुनघाडकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.