पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झालेल्या डॅा.चेतन अलोने यांचा सत्कार

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव यांच्याकडून कौतुक

अहेरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या २०२२ च्या मुख्य परीक्षेत येथील डॉ.चेतन अलोने यांनी नेत्रदीपक यश मिळविले. त्याबद्दल माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॅा.अलोने यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे कौतुक केले.

अहेरी क्षेत्रातील विद्यार्थी हळूहळू राज्यस्तरावर आपल्या गावाचा व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत, ही आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे अब्रिशराव आत्राम यावेळी म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सद्यस्थितीत अलोने हे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे व्हेटर्नरी क्षेत्रातील देशात प्रसिद्ध असलेल्या प्रीमियम चिक फिड कंपनीत कार्यरत आहे.

डॉ.चेतन अलोणे यांचे अंब्रिशराव आत्राम यांची संस्था असलेल्या धर्मराव कृषी विद्यालयात झाले. त्यामुळे सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद दोन्तुलवार, तसेच राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका जयश्री खोंडे यांनीसुद्धा डॉ.चेतन अलोणे यांचा सन्मान व अभिनंदन करून भेटवस्तु दिल्या.